
जम्मू-कश्मीरमधील कठुआ जिह्यात लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज पुन्हा चकमक उडाली. या चकमकीत तीन जवान शहीद झाले तर पाच जवान जखमी झाले.
लष्कराने दहशतवाद्यांच्या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान, आणखी तीन ते चार दहशतवादी जुठाणा येथील जंगलात लपले असण्याची शक्यता असून लष्कराने त्यांची शोधमोहीम तीव्र केली आहे.
- चकमकीत दोन डीएसपी आणि सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झाले. उपचारासाठी त्यांना जम्मू मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले. त्यापैकी गंभीर जखमी झालेल्या तिघांचा उपचादारम्यान मृत्यू झाला.