जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच; 32 महिन्यांत 48 सैनिक शहीद, पाहा मोठ्या हल्ल्यांची टाइमलाइन

जम्मू आणि कश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह चार हिंदुस्थानी लष्कराचे जवान शहीद झाले असून, गेल्या 32 महिन्यांत जम्मू प्रदेशात शहीद झालेल्या लष्कराच्या जवानांची संख्या 48 वर पोहोचली आहे.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डोडा येथील देसा भागात हिंदुस्थानी लष्कर आणि जम्मू आणि कश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली तेव्हा ही चकमक झाली. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती.

‘दहशतवादी लपलेल्या ठिकाणाी खात्री रात्री 9 वाजता झाली त्यानंतर चकमक सुरू झाली’, अशी माहिती लष्कराच्या 16 कॉर्प्सने सोमवारी रात्री X वर पोस्ट केली आहे.

भूतकाळातील मोठ्या हल्ल्यांची टाइमलाइन

  • 16 जुलै 2024: डोडा चकमकीत लष्कराचे चार जवान शहीद झाले.
  • 8 जुलै 2024: कठुआ जिल्ह्यात लष्करी ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले आणि पाच जण जखमी झाले.
  • 11-12 जून 2024: दुहेरी हल्ल्यात 6 सैनिक जखमी.
  • 9 जून 2024: 9 जून 2024: दहशतवाद्यांचा यात्रेकरूंच्या बसवर हल्ला, नऊ जण ठार आणि 33 जखमी.
  • 4 मे, 2024: पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात हिंदुस्थानी वायुसेनेचा एक जवान शहीद झाला, तर हिंदुस्थानी वायुसेनेच्या एका वाहनासह दोन वाहनांचे नुकसान.
  • 21 डिसेंबर 2023: कारवाईत चार जवान शहीद झाले.
  • नोव्हेंबर 2023: कारवाईत दोन कॅप्टनसह पाच सैनिक शहीद झाले.
  • एप्रिल-मे 2023: दुहेरी हल्ल्यात 10 जवान शहीद झाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी जम्मू कश्मीरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. वाढत्या दहशतवादी घटनांदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात जम्मू-कश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आढावा बैठक घेतली होती.

त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा-संबंधित परिस्थिती आणि सशस्त्र दलांकडून सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवायांचा संपूर्ण आढावा देण्यात आला.

त्यांनी जम्मू आणि कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशीही चर्चा केली आणि स्थानिक प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यात आली.