Jammu and Kashmir – कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; माजी सैनिकाची गोळ्या झाडून हत्या, पत्नी-मुलगी गंभीर जखमी

फाईल फोटो

जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवाद्यांनी माजी सैनिक आणि त्याच्या कुटुंबावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात माजी सैनिक मंजूर अहमद वागे यांचा मृत्यू झाला आहे तर त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी आहेत. बेहिबाग परिसरात ही घटना घडली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तर पोलिसांनी मंजूर अहमद यांना श्रीनगरच्या रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

ही घटना कुलगाममधील बेहीबाग भागात घडली. मंजूरच्या पत्नीचे नाव अमिना असून मुलीचे नाव सानिया (13) आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दलाकडून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे.