भाजपच्या माजी आमदाराने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या, कारण अस्पष्ट

जम्मू कश्मीरमधीला भाजपचे माजी आमदार फकीर मोहम्मद खान यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. खान हे जम्मू कश्मीरमधील भाजपचे वरिष्ठ नेते होते. खान यांनी आत्महत्या केल्याचे पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

खान हे श्रीनगरच्या तुळशीबागेतली सरकारी बंगल्यात राहत होते. त्यांच्याकडे एक सर्व्हिस रायफल होती. या रायफलने त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळी लागल्यानंतर खान रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. खान यांनी हे धक्कादायक पाऊल का उचलले याचे कारण कळाले नाही.