
शेतकऱ्याना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून कालच मुंबई येथे आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असता कारभारी म्हसलेकर यांनी जालन्यातील बदनापूर येथे येताच अकोला शिवारातील सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत उपोषण सुरू केले असून संपूर्ण कर्जमाफीशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी कारभारी म्हसलेकर आणि युवा सेनेचे ऋषी थोरात यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अकोला गावात विहिरीत बाज टाकून आमरण उपोषण सुरू केले. सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत हे आमरण उपोषण सुरू केले. कालच या दोघासोबत अनेक शिवसैनिकांनी मुंबईत आंदोलन केल्याप्रकरणी या पदाधिकाऱ्याला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी थेट विहिरीत उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत माघार घेणार नसून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.