मला हलक्यात घेऊ नका, घोडचूक ठरेल मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

”माझ्या समाजाला आणि मला हलक्यात घेण्याचं काम केलं जात आहे. ही सरकारची घोडचूक त्यांना इतकी भोवणार आहे, हे पुढे-पुढे बघाच. आता पुन्हा नव्या अंकाला सुरुवात झाली आहे”, असं म्हणत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारला इशारा दिला आहे. जालन्यात माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा राज्यव्यापी आंदोलन पुकारणार आहेत. शनिवारी सकाळी 10 वाजत ते पत्रकार परिषद घेणार आहेत. अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा मंडप बांधण्याचं काम सुरु झालं आहे. ते उद्या आमरण उपोषण किंवा साखळी उपोषणाची घोषणा करू शकतात. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.