
जालन्यातील एका वकिलाने घरात वारंवार होणाऱ्या चोरीला कंटाळून थेट चोराला विनम्र आवाहन केले. त्यात या वकिलाने चोरी करण्याच्या कलेला वंदन करत चोरट्याला आपल्या दरमहा औषधांच्या खर्चाचा दाखला देत आपल्या घरी चोरी करू नको, असे आर्जव केले. वकील ललीत हट्टेकर असे या पीडित वकिलाचे नाव आहे. ते जालना शहरातील एसटी कॉलनीत राहतात. आतापर्यंत त्यांच्या घरी तब्बल चार वेळा चोरी झाली आहे.