
जालना जिल्ह्यातील शासकीय गुत्तेदारांना 7 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर जिल्हा मार्गासाठी 4.5 टक्के आणि राज्य मार्गासाठी 1.5 टक्के या गुणोत्तराने निधी प्राप्त झाला आहे. कंत्राटदारांना अक्षरशः अतिशय क्रुरपणे महाराष्ट्र शासन वागणुक देत असल्याच्या निषेधार्थ आज 17 फेब्रुवारी रोजी जालना सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या बाहेर गुत्तेदारांनी यंत्रसामुग्री जमा करणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाभरातील गुत्तेदारांनी त्यांचे सर्वच यंत्रसामुग्री कार्यालयात जमा केल्या आहेत. सर्वच गुत्तेदारांनी सरकारच्या या वागणुकीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
कंत्राटदारांना अतिशय क्रूरपणे महाराष्ट्र शासन वागणूक देत आहे. मशीनरीचे कर्ज हप्ते, मजुरांच्या मजुरी, कामगारांचे वेतन, डांबर, सिमेंट, क्रेशरची मटेरियल्स या सर्व घटकांची देणी आम्ही फेडू शकत नाहीत. म्हणून आजपासून सगळी मशीनरी सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात जालना येथे जमा करत आहोत. 50 टक्के निधी प्राप्त होईल तेव्हाच कामे सुरू होतील, तोपर्यत काम बंद आंदोलन चालू राहील, असा इशाराही गुत्तेदारांनी कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. तसेच यावेळी कार्यालयात यंत्रसामुग्री जमा करण्यात आल्या.
सार्वजनिक बांधकाम विभाग जालनाच्या कार्यालयासमोर सर्व कॉन्ट्रॅक्टरांनी काम बंद करून कार्यालयासमोर यंत्रसामुग्री जमा केली आहे. याप्रसंगी ठिय्या आंदोलन करून निवेदन अधिक्षक अभियंता स्मिता पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.