Jalna News : आष्टी पोलिसांची धडाकेबाज कारवाई, लाखो रुपयांचा गुटखा जप्त

जालन्यातली परतुर तालुक्यातील आष्टी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

जालना जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या गुटख्याची खुलेआम विक्री व वाहतुक करण्यात येत आहे. दिवसेंदिवस या प्रकारांमध्ये वाढ होत चालली आहे. अशातच काल (22 जुलै) रोजी सकाळी आष्टी पोलीसांना अंबड ते पाथरी रोडने प्रतिंबंधीत गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, भिमराव राठोड, शेळके राहूल वाघमारे, सज्जन काकडे, गोकुळ देवळे, राणा पांढरे यांच्या पथकाने साफळा रचून आयशर गाडी पकडली. गाडीमध्ये गुटखा व तंबाखू आढळून आली. पोलिसांनी मुद्देमालासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. अन्नभेसळ अधिकारी जालना यांच्या पथकामार्फत पंचनामा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे गुटख्याची किंमत व गुटखा माफियांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.