
जालन्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेने मोठी कारवाई करत 86 किलो गांजा जप्त केला आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर एका कारमधून हा गांजासह 29 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी जालना जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री करणारे इसमांविरुध्द कार्यवाही करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 23 एप्रिल रोजी जालना शहरातून छत्रपती संभाजीनगरकडे एका कारमधून (.एमएच 16 एटी 8302) अंमली पदार्थांची अवैध वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखा जालना यांनी संयुक्त कारवाई करुन आरोपी विजय अशोक गाढे (रा. शेवगाव ता. शेवगाव जि. अहिल्यानगर), अमोल व्दारकादास चांदणे (रा. रुई ता. अंबड जि. जालना), बाबासाहेब पंढरीनाथ मुंजवार (रा.भार्डी ता. अंबड जि. जालना) यांच्या ताब्यातून एकूण 85 किलो 640 ग्रॅम गांजा, गुन्ह्यात वापरलेले वाहन व 4 मोबाईल असा एकूण 28 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, दहशतवाद विरोधी शाखा, जालना यांच्या तक्रारीवरुन आरोपीविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे चंदनझिरा हे करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खाडे, यासिन, शेख अख्तर, पोहेकॉ मारोती शिवरकर, विनोद गडदे, कैलास कुरेवाड, स्था.गु.शा.चे रुस्तुम जैवाळ, रामप्रसाद पव्हरे, गोपाल गोशीक, सतीष श्रीवास, इरशाद पटेल, सचीन राऊत, कैलास चेके, चालक भरत कडुळे, सौरभ मुळे, गणेश वाघ यांनी केली आहे.