नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड वासीय सज्ज, ‘जल्लोष 2025’ कार्यक्रमाचं करण्यात आलं आयोजन

देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था देवगड व जल्लोष समिती आयोजित जल्लोष 2025 नववर्षाचे स्वागत या कार्यक्रमासाठी देवगड वासीय आयोजक सज्ज झाले आहेत. वाहतुकीची कोंडी होऊ नये व त्या योग्य ते वाहन पार्किंग सुविधा उपलब्ध व्हावी, या अनुषंगाने देवगड पोलीस प्रशासनाचे नियोजन झाले असून जल्लोष 2025 या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या वतीने नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू झाली आहे. व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी जल्लोष समिती सदस्य, कार्यरत आहेत. आवश्यक रंगमंच स्टेज उभारणी, फूड स्टॉल उभारणी विद्युत रोषणाईची कामे पूर्णत्वास नेली जात आहेत.

शनिवार रविवार सुट्टीचा हंगाम असल्याने देवगड बीच याठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. नववर्ष स्वागत निमित्त सोमवार 30 डिसेंबर व मंगळवार 31 डिसेंबर या दोन दिवशी विविध उपक्रमांचे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच देवगड बीच या ठिकाणी फूड स्टॉल, आकर्षक विद्युत रोषणाई नववर्षाचे फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत त्यांच्या सोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रसिकांना लाभणार आहे. या अनुषंगाने देवगड बीच या परिसराची पाहणी देवगड नगराध्यक्ष साक्षी प्रभू यांनी केली.