जळगावमधील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने अनेक प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रेनबाहेर उड्या मारल्या. मात्र त्याच वेळी दुसऱ्या ट्रॅकवरून समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले. या अपघातात अकरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींचा संपूर्ण उपचार मोफत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.