
रस्त्याच्या शेजारी झोपलेल्या तीन कामगारांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना सोमवारी रात्री जळगावमध्ये घडली. तिघेही परप्रांतीय आहेत. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.
जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रस्त्याचे काम सुरू आहे. तेथेच मयत तिघे मजुरी करत होते. सोमवारी रात्री तिघेही रस्त्याच्या शेजारी असलेल्या लोखंडी पट्टीवर झोपले होते. यावेळी रात्री अज्ञात वाहनाने तिघांनाही चिरडल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला.
मंगळवारी सकाळी ही बाब उघडकीस आली. त्यानंतर नशिराबाद पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.