![jalana](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/jalana-696x447.jpg)
जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे साकळगांव शिवारामधील शेतामध्ये मानवी आरोग्यास घातक असलेला गांज्याची शेती करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा व घनसावंगी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच शेतातील 22 गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहे.
जालना जिल्हयात अवैध गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना दिल्या होत्या. यानंतर गांजा विक्री करणारे इसमांची माहिती काढण्यात आली. दरम्यान, 13 फेब्रुवारी रोजी पोलिसाना जालन्यातील मौजे साकळगावात गांजाची शेती असल्याची माहिती मिळाली. भास्कर माणिक माने असे या शेतकऱ्याचे नाव आहे. भास्कर माने हे मानवी आरोग्यास हानीकारक असलेला गांजाची शेती करुन स्वत :च्या आर्थीक फायद्यासाठी गांजा विक्री करत होते.
मिळाले बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा जालना व घनसावंगी पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी मौजे साकळगांव येथे भास्कर माणिक माने याच्या शेतावर छापेमारी करून शेताची पाहणी केली. भास्कर माणिक माने यांनी शेतामध्ये गांजाच्या एकूण 22 झाडांची लागवड केली होती. या 22 झाडांचे वजन 5 किलो 464 ग्रॅम असून त्यांची किंमत 54 हजार 640 रुपये इतकी आहे. पोलिसांनी गांजाची 22 झाडे जप्त केली आहेत. तसेच भास्कर माणिक माने याच्याविरुद्ध घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, घनसावंगी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक केतन राठोड, स्था.गु.शाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, व सोबत स्थागुशाचे अमंलदार गोपाल गोशिक, फुलचंद गव्हाणे, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, देविदास भोजने, सतिश श्रीवास, संदिप चिंचोले, तसेच घनसावंगी पोलीस ठाण्याचे अंमलदार रंजित वैराळ, सुनिल वैदय, प्रकाश पवार, धनाजी गवळे, गंगाराम कदम इत्यादींनी केली आहे.