चीनसोबतचा सीमा प्रश्न सहमतीने सोडवू -जयशंकर

2020नंतर चीनसोबतचे आपले संबंध हे सामान्य नाहीत. मात्र दोन्ही देशांमध्ये सातत्याने द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही देशांना मंजूर होईल, असा तोडगा काढला जाईल. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज लोकसभेत दिली. जयशंकर यांनी चीनच्या मुद्दय़ावर सविस्तर निवेदन केले. दोन्ही देशांतील संबंध गेल्या काही वर्षांमध्ये बिघडल्याचेही त्यांनी कबूल केले.