संसदेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे हटवले

हिंदुस्थानच्या लोकशाहीचं मंदिर अशी ओळख असलेली वास्तू म्हणजे संसद भवन. या संसदेच्या प्रांगणात वास्तू समोरच बसवलेले महापुरुषांचे पुतळे हटवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यात महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सपोस्टवर काही फोटो शेअर केले असून त्यात या पुतळ्यांना हटवण्याचं काम सुरू असल्याचं दिसून येत आहे. ते लिहितात की, संसदेच्या प्रांगणातले, मूळ वास्तूच्या समोरच ठळकपणे दिसणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे आताच त्यांच्या जागेवरून हटवण्यात आले आहेत. हे अतिशय वाईट आहे, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.