पंतप्रधान आणि शिक्षणमंत्री असंवेदनशील; NEET-UG काऊन्सलिंग स्थगितीवरून जयराम रमेश यांचा निशाणा

नीट-यूजी प्रकरणात मोठी अपडेट आली असून पुढील सूचना मिळेपर्यंत काऊन्सलिंग स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एबीबीएस आणि बीडीएस अंडरग्रॅऐज्यूएट मेडिकल कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार नाही. याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू 8 जुलैला यावर सुनावणी होईल. आता यावरून विरोधकही आक्रमक झाले असून प्रकरणात मोठी अपडेट आली काऊन्सलिंग स्थगितीवरून काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी पंतप्रधान आणि शिक्षकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी नीट-यूजी काऊन्सलिंग स्थगितीच्या निर्णयानंतर एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. ‘नीट-यूजीचे प्रकरण दिवसेंदिवस बिकट होत चालले आहे. यातूनच पंतप्रधा आणि त्याचे बायोलॉजीकल शिक्षणमंत्री हे किती अकार्यक्षण आणि असंवेदनशील आहेत हे स्पष्ट होते. आपल्या लाखो तरुणांचे भविष्य त्यांच्या हातात अजिबात सुरक्षित नाही’, अशी टीका जयराम रमेश यांनी केली.

नीट-यूजी काऊन्सलिंग 6 जुलै रोजी होणार होती. मात्र अचानक ही काऊन्सलिंग स्थगित करण्यात आली. यामागील कारणही स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुरता गोंधळ उडाला आहे.

दरम्यान, नीट-यूजी परीक्षेवरून चांगलेच वातावरण तापले आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहोचले असून यावर सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला 1563 उमेदवारांची फेरपरीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. यावेळी नीट-यूजी काऊन्सलिंग स्थगित केले जाणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. मात्र आता मेडिकल काऊन्सिल समितीने याबाबत निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एसीसी लवकरच पुढील सूचना जारी करणार असल्याचे वृत्त आहे.