विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी महायुतीचा ‘मोडानी’ला नजराणा! जयराम रमेश यांचा सणसणीत टोला

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होईल. केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी साडे तीन वाजता पत्रकार परिषदेमध्ये निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक ट्विट केले आहे. यात त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी महायुतीने ‘मोडानी’ला कसा नजराणा दिला याची आकडेवारीच दिली आहे.

जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, आज दुपारी 3.30 वाजता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा ही निवडणूक आयोगाकडून होईल अशी अपेक्षा आहे. महायुती सत्तेत परत येणार नसल्याची खात्री असलेल्या महायुतीने शेवटच्या काही दिवसांमध्ये मुंबई आणि महाराष्ट्रातील जनतेच्या खर्चावर मोडानीला नजराणा दिल्या जात आहेत.

  • 15 सप्टेंबर 2024 – मोडानीला महाराष्ट्रातील 6600 मेगावॅट वीज पुरवण्यासाठीचा ऊर्जा करार मिळाला, ज्याच्यासाठी उपभोक्त्यांना जास्त किंमत चुकवावी लागणार आहे.
  • 30 सप्टेंबर 2024 – पर्यावरणीयदृष्ट्या नाजूक अशी 255 एकर मिठागरांची जमीन मोडानीला दिली.
  • 10 ऑक्टोबर 2024 – मढ येथील 140 एकर जमीन मोडानीला दिली गेली.
  • 14 ऑक्टोबर 2024 – मुंबईतील देवणारची 124 एकर जमीन मोडानीला दिली.

त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून स्पष्ट आदेश आहेत की महायुतीचे निवडणुकीत भविष्य अंधकारमय आहे, पण सत्तेतून जाण्यापूर्वी मोडानीचा आर्थिक भविष्य सुरक्षित करायचा आहे, असे जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.