जग्वारने अमेरिकेत कारची शिपमेंट थांबवली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचे पडसाद आता जगभरात उमटू लागले आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफला विरोध म्हणून टाटा मोटर्सची प्रीमियम कार कंपनी जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ने एका महिन्यासाठी ब्रिटनमधून अमेरिकेत कारची शिपमेंट थांबवली आहे. ट्रम्प सरकारच्या 25 टक्के टॅरिफ धोरणापासून वाचण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.