घशात जळजळ आणि वेदना होत आहेत; हे घरगुती उपाय करून बघा…

दिल्लीत सध्या वायू प्रदूषण सर्वाधिक चर्चेचा विषय बनला असून तेथील हवा विषारी बनली आहे. अशावेळी मास्क लावून आणि घरात राहून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासोबतच अनेक लोक प्रदूषण टाळण्यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबत आहेत.घसाजवळ जळजळ आणि वेदना होत असेल तर काही घरगुती उपाय केल्यास त्यावर आराम पडेल.

वायू प्रदूषणामुळे घशातील जळजळ होत असल्यास गूळ हा गुणकारी आहे.

आजतकच्या वृत्तानुसार, आतडे मायक्रोबायोम तज्ज्ञ शोनाली सभरवाल यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये याबद्दल सांगितले होते की, वायू प्रदूषणामुळे घशाची जळजळ आणि खोकला कमी करण्यासाठी गुळाचा एक छोटा तुकडा दिवसातून 2-3 वेळा आणि त्यावर एक ग्लास पाणी घेतल्यास आराम पडेल.

गुळ शरीराला डिटॉक्स करत नाही मात्र श्वसनमार्गातून हानिकारक कण काढून टाकण्यास मदत करतं.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ऑर्गेनिक गूळ घसा साफ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे वायू प्रदुषणामुळे विषारी घटकांपासून मदत होते.

गुळामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि आर्यन भरपूर प्रमाणात असते आणि त्याचे आरोग्याला फायदे होतात.याने कफ, अपचन आणि पित्त यावर आराम मिळतो.

गूळ गळा आणि फुफ्फुसामध्ये क्लींझरसारखे काम करते आणि संसर्गापासून वाचण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते.

गुळातील अँटिऑक्सिडंट्स प्रदूषणामुळे होणाऱ्या नुकसानीपासून फुफ्फुसांचे संरक्षण करण्यास मदत करतात.

‘गरम पाण्यात, तुळशीची पाने आणि आले मिसळून प्यायल्याही आराम मिळतो.