Photo – संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी; दर्शनासाठी गर्दी

फोटो: चंद्रकांत पालकर, पुणे

दोन दिवसांपूर्वी देहूवरुन जगद्गुरु संत तुकाराम महाराज तर रविवारी आळंदीहून जगद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं प्रस्थान झालं असून सोमवारी दोन्ही पालख्यांचा पुण्यात मुक्काम आहे. जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठ्ठल मंदिरात तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली यांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी आहे. यावेळी पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. भक्तिमय वातावरणात आज दोन्ही पालख्यांचे पुण्यात आगमन झाले. पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी उन्हापावसाची तमा न बाळगता शिस्तबद्धपणे रांग लावली होती. बॉम्ब शोधक पथकाकडून जिमी श्वानाने निवडुंग्या विठ्ठल मंदिरात जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सलामी दिली. पुण्याला ड्रग्स मुक्त करण्यासाठी पुणेकर युवकांनी पांडुरंगाला साकडे घातले. यावेळी विश्रांती घेणारे वारकरी, जेवणासाठी बसलेली वारकऱ्यांची भलीमोठी पंगत, गप्पागोष्टीमध्ये रंगलेले वारकरी असे वातावरण दिसत आहे. (छाया – चंद्रकांत पालकर)