
पाकिस्तानी लष्कराने बलूच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) 23 दहशतवाद्यांना ठार केले असून बंडखोरांनी ओलीस धरलेल्या 155 रेल्वे प्रवाशांची सुटका केली आहे. मंगळवारी पाकिस्तान, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये बंदी असलेल्या बलूच संघटनेने जाफर एक्प्रेस या क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या प्रवासी रेल्वेवर हल्ला चढवला होता. बुधवारी बचावकार्या दरम्यान 37 प्रवासी जखमी झाले. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. हायजॅक रेल्वेच्या नऊ डब्यांमध्ये सुमारे 500 प्रवासी होते. त्यातील 214 जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. सुटका झालेल्या पीडितीने खूप भयानक परिस्थितीतून बाहेर पडलो, असे सांगितले.