![medical college](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/medical-college--696x447.jpg)
मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूरच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये किळसवाणा प्रकार घडला आहे. येथे कॉलेजच्या शौचालयामधील पाण्याने जेवण बनवले जात आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लोकांकडून उपस्थित केला जात आहे.
ही घटना जबलपूर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेलमध्ये घडली आहे. 6 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत देशभरातील डॉक्टर आणि तज्ज्ञ सहभागी झाले होते. परिषदेदरम्यान आलेल्या पाहुण्यांसाठी जेवणाची आणि पेयांची व्यवस्थाही करण्यात आली होती. याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये शौचालयातून अन्न शिजवल्या जाणाऱ्या ठिकाणी पाईपद्वारे पाणी वाहून नेले जात असल्याचे दिसून येत आहे.
जबलपुर के सरकारी मेडिकल कॉलेज में राष्ट्रीय स्तर का कॉन्फ्रेंस था, एक वीडियो वायरल हुआ जिससे ऐसा लग रहा है कि खाना शौचालय में लगे नल के पानी से बना, प्रशासन का कहना है इस पानी से सिर्फ बर्तन धुले, जांच के आदेश दिए गए हैं pic.twitter.com/gl3CP88v6r
— Anurag Dwary (@Anurag_Dwary) February 11, 2025
दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आणि संपूर्ण कॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. यानंतर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले आहे. हे पाणी फक्त भांडी स्वच्छ करण्यासाठी वापरले जात होते, स्वयंपाकासाठी नाही. त्यामुळे व्हिडीओचा चूकीचा अर्थ काढू नये, असे कॉलेजचे डीन नवनीत सक्सेना यांनी स्पष्ट केले आहे.
आता आरोग्या विभागानेही याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मिश्रा यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. ‘व्हिडीओमध्ये शौचालयाच्या नळातील पाण्याचा वापर केल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार, हे पाणी फक्त भांडी धुण्यासाठी वापरले जात होते. व्हिडीओ समोर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत’, असे त्यांनी सांगितले.