इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची थट्टा; पत्रकाराला दंड

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उंचीवरून थट्टा करणाऱया पत्रकाराला कोर्टाने दंड ठोठावला आहे. मेलोनी यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवल्याबद्दल मिलान न्यायालयाने एका पत्रकाराला 5000 युरो (4 लाख 55 हजार 569 रुपये) नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये ट्विटरवर मेलोनीच्या उंचीबद्दल विनोद केल्याबद्दल पत्रकार जिउलिया कॉर्टेस यांना 1,200 युरोचा निलंबित दंडही ठोठावण्यात आला होता. न्यायालयाने याला ‘बॉडी शेमिंग’ असे म्हटले होते.