विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन जुलैमध्ये?

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर दिल्लीतील सत्तास्थापनेच्या हालचाली, विधान परिषदेच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची आचारसंहिता, विधानसभा अध्यक्षांचा परदेश दौरा अशा विविध कारणामुळे विधिमंडळाचे 10 जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पावसाळी अधिवेशन होण्याची शक्यता आहे. 21 मे रोजी विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र राज्यातील मतदान संपले तरी अनेक मंत्री इतर राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात गुंतले असल्याने सल्लागार समितीची बैठकच झाली नाही.