आयटी इंजिनीअर चालवतोय रिक्षा

एकटेपणा दूर करण्यासाठी माणसं वेगवेगळय़ा गोष्टींत गुंतून राहणे पसंत करतात. आता बंगळुरुच्या आयटी इंजिनीअरचे उदाहरण घ्या ना… मायक्रोसॉफ्टसारख्या बडय़ा कंपनीत महिन्याकाठी लाखो रुपये पगार घेणारा 35 वर्षीय इंजिनीअर विकेण्डला चक्क बंगळुरूच्या रस्त्याकर चक्क रिक्षा चालवतोय. विशेष म्हणजे, तो रिक्षा चालवण्याचे काम पैसा कमावण्यासाठी नव्हे तर एकटेपणा दूर करण्यासाठी करतोय. व्यंकटेश गुप्ता नावाच्या एका युजरने एक्सवर पोस्ट शेअर करत या इंजिनीअर तरुणाचे कौतुक केले आहे. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली आहे.