
पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून उच्चशिक्षित आयटी इंजिनीअरने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना चंदननगर परिसरात घडली आहे. तो मुलाला घेऊन बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याने मुलाचा खून केल्यानंतर मृतदेह जंगलात फेकून दिल्याचे उघडकीस आले. हिम्मत टीकेटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी माधव टीकेटी (32) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.