इस्रायलचे सैन्य गाझातून बाहेर पडण्यास सुरुवात; तीन ओलिसांना सोडले

युद्धविराम करार आणि हमासकडून इस्रायली ओलिसांना सोडण्यास सुरुवात झाल्यानंतर इस्रायली सैन्याच्या जवानांनी गाझापट्टीतून बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. करारानुसार नेटझारीम या गाझातील उत्तरेकडील पट्टय़ातून सैन्य 6 किलोमीटर मागे घेण्याचे इस्रायलने मान्य केले आहे. याच भागाचा वापर इस्रायलने युद्धासाठी केला होता. गेल्या महिन्यापासून युद्धविराम करारानुसार पुढील घडामोडींना सुरुवात झाली. इस्रायलने पॅलेस्टिनींना गाझापट्टीत परतण्यास मंजुरी दिली. 12 महिने हा युद्धविराम करार असणार आहे. हमासकडून इस्रायलच्या जास्तीत जास्त ओलिसांची सुटका करण्याच्या दृष्टीने हा युद्धविराम करार वाढवलाही जाऊ शकतो. दरम्यान, शनिवारी 3 इस्रायली ओलिसांना सोडण्यात आले. यात एली शराबी (52), ओहद बेन अमी (56) आणि लेवी (34) यांचा समावेश आहे. त्या भावुक झाल्या होत्या.