इस्रायली सैन्याने आज लेबनॉनमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 24 नागरिकांचा मृत्यू झाला. हिजबुल्लाहच्या तळावर हल्ला करण्याच्या उद्देशाने इस्रायलकडून लेबनॉनमध्ये हवाई हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांमध्ये नागरिकांचा बळी जात असल्याचे चित्र आहे. इस्रायलकडून सातत्याने हल्ले होत असून जीव वाचवण्यासाठी आतापर्यंत तब्बल 60 हजार नागरिकांनी घरे सोडल्याची माहिती लेबनीज कायदेतज्ञ हुसैन हज हसन यांनी दिली. दरम्यान,पश्चिम आशियात प्रचंड तणाव असताना आता येथील स्थिती आणखी गंभीर बनण्याची शक्यता आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी इस्रायलवर हल्ला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आह