
ओलिसांची सुटका करेपर्यंत हल्ला करणार असल्याची धमकी दिल्यानंतर आज पुन्हा एकदा इस्रायलने गाझा पट्टीत हल्ला करून हमासच्या वरिष्ठ राजकीय नेत्यासह 19 पॅलेस्टिनी नागरिकांना ठार केले. प्रत्युत्तरात हमासशी सहयोगी असलेल्या येमेनमधील इराण समर्थित हुथी बंडखोरांनी इस्रायलवर क्षेपणास्त्र सोडले. मात्र हे क्षेपणास्त्र पाडण्यात यश आले असल्याचे इस्रायली सैन्याने सांगितले.