सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ‘ऑल आईज ऑन राफा’ या फोटोला इस्रायलने जोरदार प्रत्युत्तर दिले. एआयवर जनरेट केलेला एक फोटो पोस्ट केला. परंतु, 7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर हल्ला केला त्या दिवशी हा फोटो शेअर करणारे कुठे होते? हमासच्या हल्ल्यानंतर ‘ऑल आईज ऑन इस्रायल’ असा फोटो का नाही शेअर केला, असा संतप्त सवाल इस्रायलने केला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरूच असून यामुळे हजारो लोकांचा जीव गेला आहे. तसेच अतोनात नुकसान होत आहे. इस्रायलने राफावर केलेल्या हल्ल्यात निष्पाप 45 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर जगभरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे. राफावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याचा निषेध करत जगभरातील सेलिब्रेटी, क्रीडापटू आणि अन्य लाखो लोकांनी सोशल मीडियावर ऑल आईज ऑन राफा हा फोटो शेअर केला आहे.
या फोटोवर आक्षेप घेत इस्रायलने 7 ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला झाला त्यावेळी अशी पोस्ट का नाही शेअर केली, असा सवाल लोकांना विचारला आहे. हमासने 7 ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यात इस्रायलमध्ये एक हजारांहून जास्त लोक मारले गेले होते.