अनावश्यक प्रवास टाळा! इराणच्या घातक हल्ल्यानंतर इस्रायलमधील आपल्या नागरिकांसाठी हिंदुस्थानच्या सूचना जारी

Israel-iran-tension
Photo - Reuters

इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तेल अवीवमधील हिंदुस्थानी दूतावासाने इस्रायलमधील आपल्या देशातील नागरिकांसाठी एक सूचना जारी केला आहे. ॲडव्हायझरीमध्ये हिंदुस्थानी नागरिकांना सतर्क राहण्यास आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रोटोकॉलचे पालन करण्यास सांगितले आहे.

‘कृपया सावधगिरी बाळगा, अनावश्यक प्रवास टाळा आणि सुरक्षित आश्रयस्थानांच्या (Safety Shelter) जवळ रहा. दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहे आणि आपल्याच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रायली अधिकाऱ्यांच्या नियमित संपर्कात आहोत’, असे सूचना पत्रात म्हटले आहे.

दूतावासाने आपत्कालीन संपर्कासाठी नंबर देखील शेअर केला आहे +972-547520711, +972-543278392.

नुकताच इस्रायली सैन्याने केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून इराणने मंगळवारी संध्याकाळी इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली.

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘इस्माईल हनीयेह, सय्यद हसन नसराल्लाह आणि निलफोरोशन यांच्या हौतात्म्याला प्रत्युत्तर म्हणून, या प्रदेशाला लक्ष्य केले’.

इस्रायली सैन्यानं सांगितलं की इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला थांबला आहे आणि लोक आश्रयस्थान सोडू शकतात.

‘परिस्थितीविषयक मूल्यांकनानंतर, असा निर्णय घेण्यात आला की आता देशभरातील सर्व भागात संरक्षित जागा सोडण्याची परवानगी आहे’, असे एका निवेदनात म्हटले आहे.