इस्रायलने इराणच्या 10 सैन्य ठिकाणावर हवाई हल्ला केला. हा हल्ला करण्यासाठी इस्रायलने 100 हून अधिक फायटर जेटचा वापर करत इराणच्या पाच शहरांतील 10 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. इराणने 1 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला केला होता. यावेळी इराणने 180 क्षेपणास्त्र डागले होते. या हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायलने इराणवर हा हल्ला केला. हा हल्ला इतका मोठा होता की, हल्ल्यानंतर स्पह्टांचा आवाज इराणची राजधानी तेहरान पर्यंत पोहोचला. इराण आणि इस्रायल यांच्यातील हल्ल्यानंतर आता युद्धाची ठिणगी पेटली असून युद्धाचा धोका वाढला आहे. इराण समर्थक गाझात हमास आणि लेबनानमध्ये हिजबुल्ला यांची आधीपासून इस्रायलसोबत जंग सुरू आहे. इराणच्या सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे इस्रायली सैन्यांनी शनिवारी सांगितले. इस्रायलीच्या दोन अधिकाऱ्यांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, या हल्ल्यात परमाणू किंवा तेल पुरवठा करणाऱ्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नाही.
इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायली लष्कराची प्रतिक्रिया सुद्धा आली आहे. या हल्ल्यानंतर आमची विमाने सुरक्षित परत आली आहेत. आमच्या विमानांनी अशा मिसाईल निर्माण संयंत्रावर हल्ला केला आहे. ज्याचा वापर मिसाईल बनवण्यासाठी केला जात होता. इराणने गेल्या वर्षी इस्रायलवर हल्ला केला होता. त्यावेळी याच मिसाईलचा वापर केला होता.
लोकांमध्ये पसरली भीती
इस्रायलच्या हल्ल्यानंतर स्पह्टांचे मोठे आवाज ऐकायला मिळाले. त्यामुळे आजूबाजूंच्या भागात भीती पसरली. इराणकडून शनिवारी सकाळी देशातील एअरस्पेस बंद करण्यात आले होते. इस्रायलने इलाम, खुजस्तान आणि तेहरान प्रांतातील सैन्यांच्या ठिकाणांना इस्रायलकडून टार्गेट करण्यात आल्याचे इराणच्या सैन्यांनी सांगितले. इस्रायलने पाच शहरात हल्ले केले परंतु, या हल्ल्यात फार नुकसान झाले नाही, असेही इराणने म्हटले आहे.