जुलै महिन्यात इराणमध्ये हमासचा नेता इस्माईल हनीयेह ठार मारल्यानंतर प्रथमच इस्रायलने त्याची जबाबदारी घेत कबुली दिली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी सोमवारी जाहीरपणे कबूल केले की इस्रायलने जुलैमध्ये इराणमध्ये हमासचा नेता इस्माईल हनीयेहला ठार मारले. ज्यामुळे तेहरानसह गाझामध्ये तणाव वाढण्याचा धोका निर्माण झाला.
‘जेव्हा हौथी दहशतवादी संघटना इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागत आहेत, तेव्हा मी सुरुवातीलाच एक स्पष्ट संदेश देत आहे की, आम्ही हमासला पराभूत केले आहे, आम्ही हिजबुल्लाला पराभूत केले आहे, आम्ही इराणच्या संरक्षण यंत्रणेला खिळखिळे केले आहे आणि उत्पादन प्रणालीचे नुकसान केले आहे. आम्ही सीरियातील असाद राजवट उखडून टाकली आहे, इतरांप्रमाणे आम्ही येमेनमधील हौथी या दहशतवादी संघटनेला संपवू’, असा इशार कॅटझ यांनी दिला आहे.
सोमवारी संध्याकाळी संरक्षण मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कॅटझ हे मार्गदर्शन करत होते. इस्रायल त्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करेल आणि ज्या तऱ्हेनं आम्ही तेहरान, गाझा आणि लेबनॉनमध्ये हनीयेह, सिनवार आणि नसराल्लाह या त्यांच्या नेत्यांचा शिरच्छेद केला त्याप्रमाणे होदेदाह आणि सनामध्ये देखील करू’, असे कॅटझ यांनी सांगितले.
येमेनमधील इराण-समर्थित गट इस्रायलची नौदल नाकेबंदी करण्याच्या प्रयत्नात असून वर्षाहून अधिक काळ लाल समुद्रातील व्यावसायिक बोटींवर हल्ला करत आहे. यासोबतच दावा करत आहे की ते गाझामधील इस्रायलच्या वर्षभर चाललेल्या युद्धात पॅलेस्टिनींसोबत असल्याचं दाखवत आहेत.
जुलैच्या महिन्याच्या शेवटी पॅलेस्टिनी गट हमासच्या राजकीय नेत्याची तेहरानमध्ये हत्या झाल्यानंतर इराणी अधिकाऱ्यांनी इस्रायलवर ठपका ठेवला होता. त्यावेळी इस्रायलने हनीहच्या हत्येची थेट जबाबदारी स्वीकारली नव्हती.
7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या नेतृत्वाखालील हल्ल्याने सुरू केलेले युद्ध गाझामध्ये भडकले असताना हनीह हा हमासच्या आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचा चेहरा होता. ते पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये युद्धविराम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यस्थी केलेल्या अप्रत्यक्ष चर्चेत भाग घेत होते.
काही महिन्यांनंतर, गाझामधील इस्रायली सैन्याने याह्या सिनवार, हनियेहचा उत्तराधिकारी आणि ऑक्टोबर 7, 2023 च्या मास्टरमाईंडला ठार मारले, ज्याने इस्रायली-पॅलेस्टिनी संघर्षात पुन्हा एकदा रक्तपात घडवून आणला.