आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल

केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देणार का असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला आहे. तसेच मणिपूरच्या या अवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जबाबदार आहेत ही बाब सुद्धा ते नाकारू शकत नाहीत असेही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करून म्हटले आहे की, मणिपूरमध्ये केंद्र सरकारने उशिरा का होईना राष्ट्रपती राजवट लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे भाजपला मणिपूर सांभाळता आले नाही याचे उत्तम उदाहरण आहे. मणिपूरच्या या अवस्थेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट जबाबदार आहेत ही बाब सुद्धा ते नाकारू शकत नाहीत. पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देणार आहेत का? आणि मणिपूरच्या आणि हिंदुस्थानच्या जनतेला हे सांगणार का की तिथे शांतता कशी परत आणणार? असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला.