राहुल गांधी गप्प राहावेत म्हणून सूडबुद्धीने कारवाई, रॉबर्ट वढेरा यांची सहा तास ईडी चौकशी

हरयाणाच्या जमीन व्यवहारातील कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडी अर्थात सत्कवसुली संचालनालयाने समन्स बजावल्यानंतर खासदार प्रियंका गांधी यांचे पती उद्योजक रॉबर्ड वढेरा आज ईडी कार्यालयात हजर झाले. यावेळी सहा तास चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आम्ही सातत्याने अल्पसंख्याकांवर बोलत आहोत म्हणून आम्हाला लक्ष्य केले जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही संसदेत आवाज उठवला. त्यांनी गप्प रहावे म्हणून सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप वढेरा यांनी केला.

राजकीय सूडबुद्धीने माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. तेव्हा मी अल्पसंख्याकांबद्दल बोललो त्यांनी मला थांबवले, आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी राहुल गांधी यांना संसदेतही बोलण्यापासून रोखले. सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असा आरोपही वढेरा यांनी केला. वढेरा यांची दोन तास चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.