24 तासांपर्यंत अकाऊंट बनवता येणार नाही, IRCTC सर्व्हिस दोन तास ढेपाळली

इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन अर्थात आयआरसीटीसीची वेबसाईट सर्व्हिस डाऊन झाली. ऐन सकाळच्या वेळी सर्व्हिस दोन तास बंद असल्याने ग्राहकांना याचा मोङ्गा फटका बसला. यानंतर आयआरसीटीसीकडून स्पष्टीकरण आले असून दुपारी 4 ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत ही समस्या राहणार आहे. ग्राहकांना नवीन नोंदणी, लॉगिन पासवर्ड बदलणे, प्रोफाईल पासवर्ड अपडेट करता येणार नाही. हे सर्व वेबसाईटच्या मेंटेनन्सचा भाग आहे. त्यापूर्वी तांत्रिक अडचणीमुळे वेबसाईट ठप्प झाली होती, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे.

सकाळी ग्राहक वेबसाईटवर गेल्यानंतर ई-तिकिटिंग सेवा देखभालीमुळे उपलब्ध नाही. नंतर प्रयत्न करा. पॅन्सलेशन/फाईल टीडीआरसाठी कृपया ग्राहक सेवा क्रमांकावर कॉल करा. 14646, 0755-6610661 आणि 0755-4090600 किंवा [email protected] वर मेल करा, असा मेसेज येत होता. आयआरसीटीसीवरून केटरिंग आणि हॉस्पिटॅलिटी, इंटरनेट तिकीट, प्रवास, पॅकेज केलेले पेयजल (रेल नीर) ची विक्री केली जाते.