पुढील एक तास रेल्वेचे तिकीट काढता येणार नाही; कारण आले समोर, वाचा सविस्तर…

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झटकीपट तिकीट बुक करता यावी यासाठी IRCTC या रेल्वेच्या वेबसाईटचा प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र अचानक IRCTC ची वेबसाईट बंद झाल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. आता रेल्वेने यासंदर्भात माहिती दिली असून पुढील एक तास IRCTC वेबसाईट बंद असणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुढील एक तास प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

IRCTC वेबसाईट अचानक बंद झाल्यामुळे सोशल मीडियावर प्रवशांनी आपली नाराजी व्यक्त केली. तासंतास रांगेत उभे राहून प्रवाशांना तिकीट काढावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातवरण आहे. तसेच वेबसाईट बंद का करण्याच आली याचे ठोस कराण सांगण्यात आले नव्हते. पंरतु आता IRCTC ने यासंदर्भात माहिती दिली आहे. वेबसाईट देखभालीचे चे काम सुरू असल्यामुळे वेबसाईट पुढील 1 तास बंद असणार असल्याचे IRCTC च्या माध्यामातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ऑनलाईन तिकीट काढता येणार नाही. तसेच काही अडचण आल्यास 14646 या क्रमांकावर किंवा [email protected] या वेबसाईटवर तुम्ही मदत घेऊ शकता.