इस्त्रायलच्या भीतीने इराण झाला गॅझेट फ्री, सैन्याला दिले आदेश

गेल्या वर्षी ऑक्टोबरध्ये गाझामध्ये इस्रायलने हल्ले केले होते. तेव्हापासून इराण समर्थित हिजबुल्लाह संघटनेचा आणि इस्रायलचा गाझा सीमेवर संघर्ष सुरू झाला होता. त्यानंतर वर्षभरात परिस्थिती आणखीन चिघळली आहे. दोन्ही बाजूने हल्ले सुरूच आहे. अशातच इस्त्रायली पेजर स्फोटानंतर इराण घाबरला आहे. त्यामुळे आता इराणच्या सैन्याने म्हणजेच इराण रिव्होल्युशनरी गार्ड्स (IRGC) ने आपल्या सर्व सदस्यांना कोणत्याही प्रकारचे संपर्क साधन वापरू नये असा सल्ला दिला आहे.

अशाप्रकारचा हल्ला होऊ नये यासाठी इराणने आयआरजीसीच्या सर्व इलेक्ट्रोनिक डिवायसेसचा तपास सुरु केला आहे. ही माहिती ईराणच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिली. हेही सांगण्यात आले की, यापैकी जास्त डिवायसेस हे ईराणच्या घरांमध्ये बनवले आहेत. रशिया आणि चीनकडून आयात केले आहेत.

आयआरजीसीच्या सर्व जवानांकडे खासकरुन वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे जेवढे गॅझेट्स आहेत, त्यांना जमा करुन त्यांचा बारकाईने तपास केला जात आहे. जेणेकरून इस्त्रायली एजंट घुसखोरी करू शकत नाहीत आणि इराणी सैनिकांसोबत तेच करू शकतील जे त्यांनी लेबनॉन-सीरियातील हिजबुल्लाच्या सदस्यांसोबत केले.

इराणमध्ये 17 सप्टेंबर रोजी हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या अनेक सदस्यांचे पेजरमध्ये स्फोट झाले. या पेजर स्फोटात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. इतकंच नाही तर या स्फोटांमध्ये चार हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यात इराणच्या एका राजदुताचाही समावेश आहे. हिजबुल्लाहा ही इराण समर्थित लेबननमधली दशहतवादी संघटना आहे. हिजबुल्लाहा संघटनेने या स्फोटांसाठी इस्रायलला जबाबदार ठरवले आहे.