मसूद पेजेशकियान इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष, कट्टरपंथीय सईद जलीली यांचा पराभव

इराणमध्ये रिफॉर्मिस्ट मसूद पेजेशकियान यांची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली असून कट्टरपंथीय सईद जलीली यांचा दारुण पराभव झाला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी इराणचे पश्चिमेकडील देशांशी असणारे संबंध मजबूत करण्याचे आश्वासन दिले होते.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये Masoud Pezeshkian यांना 16.3 मिलियन मतं पडली, तर कट्टरपंथीय उमेदवार Saeed Jalili यांना 13.5 मिलियम मतं मिळाली. इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रायसी यांचा मे महिन्यात मृत्यू झाल्यानंतर तिथे नवीन राष्ट्राध्यक्षांसाठी निवडणूक पार पडली. यात मसूद यांनी बाजी मारली.

पेजेशकियान हे व्यवसायाने हार्ट सर्जन असून बऱ्याच काळापासून संसदीय राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या विजयामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून जल्लोष सुरू झाला आहे. समर्थक रस्त्यावर उतरून विजयाचा आनंद साजरा करत आहेत.

ब्रिटनमध्ये 400 पार! अब की बार ‘मजूर’ सरकार; कीर स्टार्मर नवे पंतप्रधान, ऋषी सुनक पायउतार

दरम्यान, इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहीम रायसी यांचा मे महिन्यात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे तिथे राष्ट्राध्यपदासाठी निवडणूक घ्यावी लागली. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुची पहिली फेरी 28 जून रोजी पार पडली. पहिल्या फेरीत एकाही उमेदवाराला 50 टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळाली नाही. त्यामुळे 5 जुलैला रनऑफ निवडणूक झाली. यात मसूद यांनी विजय मिळवला असून ते राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. अर्थात, राष्ट्राध्यपदावर कोण आहे हे इराणमध्ये जास्त महत्त्वाचे नाही, कारण इराणमधली खरी सत्ता सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी चालवतात.