
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने अमुसहकार्य करार मान्य करावा, अन्यथा इराणवर अभूतपूर्व बॉम्बवर्षाव करण्यात येईल अशी धमकी दिली होती. त्यानंतर इराणने आम्ही क्षेपणास्त्रे तयार ठेवली आहे, असे सांगत अनेरिकेशी थेट पंगा घेण्याचे संकेत दिले होते. आता पुन्हा इराणने अमेरिकेला धमकी दिली असून अमेरिकेने इराणवर कारवाई केल्यास आम्हांलाही अण्वस्त्र हल्ला करावा लागेल, अशी धमकी अमेरिकेला दिली आहे.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खान खामेनी यांचे सल्लागार अली लारीजानी यांनी सोमवारी म्हटले की, अमेरिका किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांनी इराणवर हल्ला केला तर आपल्या बचावासाठी अण्वस्त्रे वापरण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही. ते म्हणाले की आपण अण्वस्त्रांकडे वाटचाल करत नाही. मात्र, इराणवर हल्ला करण्यात आला तर आम्हाला स्वतःचे रक्षण करण्यासाठी अण्वस्त्रांच्या दिशेने पावले उचलावी लागतील, असे म्हटले आहे.
लारीजानी म्हणाले की इराणला हे करायचे नाही पण आमच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. अमेरिकेने किंवा त्यांच्या मित्र राष्ट्रांद्वारे अराणवर बॉम्बहल्ला केला तर इराणला मोठे निर्णय घ्यावे लागतील. इराण अणु करारासाठी सहमत नसेल तर त्याला योग्य उत्तर दिले जाईल, इराणवर अभूतपूर्व वॉम्बवर्षाव करण्यात येईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. त्यावर इराणने अमेरिकेलाही इशारा दिला होता. आता इराणने अमेरिकेने आगळीक केल्यास त्यांना योग्य उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.