इस्रायलने लेबननमध्ये एअरस्ट्राई करून हिजबुल्लाह संघटनेचा नेता हसन नरसल्लाहला कंठस्नान घातले आहे. हिजबुल्लाह संघटनेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तर इराणने हिजबुल्लाह संघटनेला पाठिंबा देऊन इस्रायलला धमकी दिली आहे.
इराणचे वरिष्ठ नेते खामनेई यांनी हिजबुल्लाहसोबत खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले आहे. खामनेई म्हणाले की, शत्रूला या सगळ्यांचा पश्चाताप होईल. लेबननमध्ये निशस्त्र नागरिकांचा खून करण्यात आला आहे. त्यावरून झायोनिवादांचा क्रूर चेहरा जगासमोर आला आहे. अतिक्रमण करणाऱ्या नेत्यांच्या नीती आणि किती मुर्खपणाच्या आहेत हे ही समोर आल्याचे खामनेई म्हणाले.
खामनेई म्हणाले की, या घटनेचा आम्ही बदला घेणार. लेबनानमुळे शत्रूंना पश्चाताप करायची वेळ येईल असेही खामनेई म्हणाले.