
पहिल्याच पोस्टिंगवर रुजू होण्यासाठी जात असताना आयपीएस अधिकारी हर्षवर्धन सिंग (26) यांचा अपघाती मृत्यू झाला. कर्नाटकातील हासन जिह्यात ही घटना घडली. हर्षवर्धन यांचा रविवारी संध्याकाळी अपघातात मृत्यू झाला. ज्या पोलीस वाहनातून हर्षवर्धन प्रवास करत होते, त्या वाहनाचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात गाडी एका झाडाला धडकली.