भुवनेश्वर, दीपक चहरचा भाव वाढला; दुसऱया दिवशी आयपीएल लिलावात सर्वाधिक किंमत

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या मेगा लिलावात दुसऱया दिवशी भुवनेश्वर कुमार व दीपक चहर या वेगवान गोलंदाजांना चांगला भाव मिळाला. भुवनेश्वरला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या संघात घेण्यासाठी 10 कोटी 75 लाख रुपये मोजले. दुसरीकडे दीपक चहरला मुंबई इंडियन्सने 9 कोटी 25 लाख रुपयांच्या मोबदल्यात आपल्या ताफ्यात घेतले. मात्र अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर व मयंक यादव या स्टार हिंदुस्थानी खेळाडूंवर कोणीच बोली लावली नाही. त्यामुळे हे सर्व खेळाडू विकलेच गेले नाहीत.

मुंबई इंडियन्सने भुवनेश्वर कुमार या अनुभवी गोलंदाजावर पहिली बोली लावली. मग लखनऊ सुपर जायंट्सनेही यात उडी घेतली. मुंबईने 10.25 कोटींची शेवटची बोली लावली. त्यानंतर लखनऊने 10.50 कोटींची शेवटची बोली लावली. मात्र शेवटी बंगळुरूने बाजी मारली. त्यांनी भुवनेश्वरला 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले. भुवी याआधी सनरायझर्स हैदराबादचा भाग होता. आतापर्यंत प्रत्येक मोसमात तो हैदराबादकडूनच खेळला होता. हैदराबादने त्याला 2024मध्ये मानधन म्हणून 4.20 कोटी रुपये देत होते. मात्र आता भुवनेश्वरचे मानधन दुपटीने वाढले आहे. दीपक चहरला आपल्या संघात घेण्यासाठी पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस बघायला मिळाली. मात्र शेवटी मुंबईने 9.25 कोटी रुपये खर्च करून दीपकला आपल्या ताफ्यात सामील केले. चेन्नई सुपर किंग्जने दीपकच्या नावावर फक्त एकदाच बोली लावली आणि त्यानंतर संघाने आपले हात मागे घेतले. पंजाबने 8 कोटींची बोली लावल्यानंतर दीपक चहरचा नाद सोडून दिला.

मेगा लिलावात बोली लागलेले खेळाडू

चेन्नई सुपर किंग्ज ः नूर अहमद (10 कोटी), रविचंद्रन अश्विन (9.75 कोटी), डेवोन कॉन्वे (6.25 कोटी), खलील अहमद (4.80 कोटी), रचिन रवींद्र (4 कोटी), राहुल त्रिपाठी (3.40 कोटी), अंशुल कम्बोज (3.40 कोटी), सॅम करन (2.40 कोटी), गुरजनप्रीत सिंह (2.20 कोटी), दीपक हुड्डा (1.70 कोटी), विजय शंकर (1.20 कोटी), शेख रशीद (30 लाख), मुकेश चौधरी 30 लाख).

मुंबई इंडियन्स ः ट्रेंट बोल्ट (12.50 कोटी), दीपक चहर (9.25 कोटी), विल जॅक्स (5.25 कोटी), नमन धीर (5.25 कोटी), अल्लाह गजनफर (4.80 कोटी), मिचेल सॅण्टनर (2 कोटी), रायन रिकेल्टन (1 कोटी), रीस टॉपले (75 लाख), रॉबिन मिंझ (65 लाख), कर्ण शर्मा (50 लाख), अश्वनी कुमार (30 लाख), के.एल. श्रीजिथ (30 लाख).

कोलकाता नाईट रायडर्स ः वेंकटेश अय्यर (23.75 कोटी), एनरिक नॉर्किया (6.50 कोटी), क्विंटन डी कॉक (3.60 कोटी), अंगकृष रघुवंशी (3 कोटी), स्पेंसर जॉन्सन (2.80 कोटी), रहमानुल्लाह गुरबाज (2 कोटी), वैभव अरोरा (1.80 कोटी), रोवमन पॉवेल (1.50 कोटी), मनीष पांडे (75 लाख), मयंक मार्पंडे (30 लाख).

सनरायजर्स हैदराबाद ः ईशान किशन (11.25 कोटी), मोहम्मद शमी (10 कोटी), हर्षल पटेल (8 कोटी), अभिनव मनोहर (3.20 कोटी), राहुल चहर (3.20 कोटी), अॅडम झम्पा (2.40 कोटी), सिमरजीत सिंह (1.50 कोटी), ब्रायडन कार्स (1 कोटी), जयदेव उनाडकट (1 कोटी), कमिंडू मेंडिस (75 लाख), झिशान अन्सारी (40 लाख), अथर्व तायडे (30 लाख), निशांत सिंधू (30 लाख).

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ः जॉश हेजलवुड (12.50 कोटी), फिल सॉल्ट (11.50 कोटी), जितेश शर्मा (11 कोटी), भुवनेश्वर कुमार (10.75 कोटी), लियाम लिविंगस्टन (8.50 कोटी), रसिक सलाम (6 कोटी), कृणाल पंडया (5.75 कोटी), टीम डेविड (3 कोटी), नुवान थुषारा (1.60 कोटी), रोमारियो शेफर्ड (1.50 कोटी), सुयश शर्मा (2.60 कोटी), जॅकब बेथेल (2.60 कोटी), स्वप्नील सिंह (50 लाख), मनोज भांडगे (30 लाख).

दिल्ली पॅपिटल्स ः के.एल. राहुल (14 कोटी), मिचेल स्टार्क (11.75 कोटी), थंगारसू नटराजन (10.75 कोटी), जॅक फ्रेजर-मॅकगर्क (9 कोटी), मुकेश कुमार (8 कोटी), हॅरी ब्रुक (6.25 कोटी), आशुतोष शर्मा (3.80 कोटी), मोहित शर्मा (2.20 कोटी), फाफ डू प्लेसिस (2 कोटी), समीर रिजवी (95 लाख), करुण नायर (50 लाख), विपराज निगम (50 लाख), दर्शन नालपंडे (30 लाख).

पंजाब किंग्ज ः श्रेयस अय्यर (26.75 कोटी), युजवेंद्र चहल (18 कोटी), अर्शदीप सिंह (18 कोटी), मार्कस स्टोयनिस (11 कोटी), माकाx यानसन (7 कोटी), ग्लेन मॅक्सवेल (4.20 कोटी), नेहल वाधेरा (4.20 कोटी), प्रियांश आर्या (3.80 कोटी), अजमतुल्लाह उमरजई (2.40 कोटी), जोश इंग्लिस (2.40 कोटी), लॉकी फर्ग्युसन (2 कोटी), विजयकुमार व्यशक (1.80 कोटी), यश ठाकूर (1.60 कोटी), हरप्रीत ब्रार (1.50 कोटी), आरोन हार्डी (1.25 कोटी), विष्णू विनोद (95 लाख), कुलदीप सेन (80 लाख), हरनूर पन्नू (30 लाख).

लखनौ सुपर जायंट्स ः ऋषभ पंत (27 कोटी), आवेश खान (9.75 कोटी), आकाश दीप (8 कोटी), डेविड मिलर (7.50 कोटी), अब्दुल समद (4.20 कोटी), मिचेल मार्श (3.40 कोटी), शाहबाज अहमद (2.40 कोटी), ऐडन मार्करम (2 कोटी), एम. सिद्धार्थ (75 लाख), आकाश सिंह (30 लाख), आर्यन जुयाल (30 लाख), हिम्मत सिंह (30 लाख), दिग्वेश सिंह (30 लाख).

गुजरात टायटन्स ः जोस बटलर (15.75 कोटी), मोहम्मद सिराज (12.25 कोटी), कगिसो रबाडा (10.75 कोटी), प्रसिध कृष्णा (9.50 कोटी), वॉशिंगटन सुंदर (3.20 कोटी), शेरफन रदरपर्ह्ड (2.60 कोटी), जेराल्ड कुट्जी (2.40 कोटी), साई किशोर (2 कोटी), महिपाल लोमरोर (1.70 कोटी), अर्शद खान (1.30 कोटी), गुरनूर ब्रार (1.30 कोटी), ईशांत शर्मा (75 लाख), जयंत यादव (75 लाख), कुमार कुशाग्र (65 लाख), अनुज रावत (30 लाख), मानव सुथार (30 लाख).