महेंद्र सिंग धोनीचं वेट अ‍ॅण्ड वॉच! IPL 2025 खेळणार की नाही? घेणार मोठा निर्णय

चेन्नई सुपर किंग्जला (CSK) पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावून देणारा CSK चा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने आयपीएलमधून निवृत्ती संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. 7 जुलै रोजी धोनी 43 वर्षांचा झाला आहे. त्यामुळे धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेण्यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे.

महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 साली टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 साली वन डे वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. परंतु आयपीएलमध्ये धोनी अजूनही चेन्नईचे प्रतिनिधीत्व करताना दिसत आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. या काळात धोनीच्या निवृत्ती संदर्भात अनेक उलट सुलट चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. अशातच धोनीने स्वत:च आयपीएलमधून निवृत्ती घेण्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये धोनी म्हणाला की, “याला अजुन बराच वेळ बाकी आहे. खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत काय निर्णय होतो हे पहाव लागले. सध्या आमच्या हातात काही नाही. जेव्हा नियम जाहीर केले जातील, तेव्हा मी काही तरी निर्णय घेईन. जो संघाच्या हिताचा असेल.” असं धोनी म्हणाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, IPL च्या गव्हर्निंग कौन्सिलने बुधवारी मुंबईमध्ये सर्व संघ मालक आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये नियमांसदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये इम्पॅक्ट प्लेअर, किती खेळाडू रिटेन करणार आणि मोठी लिलाव प्रक्रिया किती वर्षांनी होणार या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये IPL 2025 संदर्भात नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे.

विराटनंतर आता रोहीत शर्मा परदेशात स्थायिक होणार असल्याची चर्चा, ‘या’ देशात वास्तव्यास जाणार