IPL 2025 – सर्वाधिक अर्धशतके ठोकणारा विकेटकीपर माहितीये का?

आयपीएलची फटकेबाजी सुरू झाली आहे. दररोज चाहत्यांना चौकार अन् षटकारांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. बुधवारी (26 मार्च 2025) झालेल्या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डिकॉकने वादळी खेळी करत संघाला विजय मिळवलून दिला. आयपीएलमधील त्याने 24 वे अर्धशतक ठोकत महेंद्रसिंग धोनीची बराबरी केली आहे.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुल सर्वाधिक अर्धशतक ठोकणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकून 27 वेळा 50+ धावा केल्या आहेत. तसेच या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर क्विंटन डिकॉक आणि महेंद्र सिंग धोनी यांचा समावेश आहे. दोघांच्याही नावावर 24-24 अर्धशतके आहेत. त्यानंर या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर दिनेश कार्तिक (21 अर्धशतके), संजू सॅमसन (19 अर्धशतके), ऋषभ पंत आणि रॉबिन उथप्पा (18 अर्धशतके), रिद्धिमान सहा (14 अर्धशतके), गिलक्रिस्ट (13 अर्धशतके) या खेळाडूंचा समावेश आहे.

IPL 2025 – कोणता संघ वरचढ ठरणार? हैदराबाद की लखनऊ? खेळपट्टी काय सांगते, जाणून घ्या एका क्लिकवर

क्विंटन डिकॉक पहिल्या सामन्यात स्वस्तात माघारी परतल होता. परंतु दुसऱ्या सामन्यात त्याने दमदार पुनरागमन करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 61 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 6 षटकारांच्या जोरावर नाबाद 97 धावांची वादळी खेळी केली होती. त्याचा हाच फॉर्म कायम राहिल्यास सर्वाधिक अर्धशतके ठोकणारा यष्टिरक्षक म्हणून तो पहिल्या क्रमांकावर झेप घेऊ शकतो. त्याला त्यासाठी फक्त तीन अर्धशतकांची गरज आहे. तसेच महेंद्र सिंग धोनीला सुद्धा संधीच सोनं करण्याची संधी आहे.