आयपीएल राऊंडअप – वैभव सूर्यवंशीचे स्वप्न भंग

बिहारच्या वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने वयाच्या 13 व्या वर्षी 1 कोटी 10 लाख रुपयांच्या मोबदल्यात आपल्या संघात घेतले, मात्र या करोडपती खेळाडूची वयाच्या 13 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी दुर्दैवाने हुकली. कारण वैभवने गुरुवारी वयाच्या 14 व्या वर्षात पदार्पण केले.

वैभव सूर्यवंशी या डावखुऱ्या फलंदाजांना वयाच्या 12 व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याचा विक्रम केला होता. गतवर्षीच्या 19 वर्षांखालील हिंदुस्थानी संघातही त्याची निवड झाली होती. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 58 चेंडूंत शतक ठोकून इतिहास घडवला होता. 19 वर्षांखालील क्रिकेटमधील हिंदुस्थानकडून वेगवान शतक ठोकण्याचा मान या वैभवने पटकाविलेला आहे. आता आयपीएलमध्ये सर्वात लहान वयात सामना खेळण्याचा मान कधी मिळणार याकडे वैभवचे लक्ष आहे.

IPL 2025 – ते तुझं काम होतं! ‘मुलतानचा सुलतान’ वीरेंद्र सेहवागची LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बोचरी टीका

…तर मी काही कामाचा नाही

जर मी यष्टिरक्षण करू शकलो नाही तर मी मैदानात काही कामाचा नाही. कारण  मी याच जागेवरून क्रिकेटचे योग्य पद्धतीने निरीक्षण करू शकतो. हे एक आव्हान आहे आणि हीच गोष्ट याला रोमांचक बनवतेय. गेल्या काही वर्षांपासून मी हेच होतेय. माझ्या फ्रेंचायझीलाही माझे यष्टिरक्षण हवंय. तेच म्हणताहेत, तुला जोपर्यंत खेळायचेय तोपर्यंत खेळ. मी जर खुर्चीवरही बसलेलो असेन तर ते म्हणतात, काळजी करू नकोस, तू फक्त खेळ. म्हणूनच मी वर्षातून एकदा क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटतोय, अशा भावना चेन्नईच्या महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केल्या. त्याच्या या भावनांवरून तो आणखी काही काळ चेन्नईसाठी खेळत राहणार, हे स्पष्ट झालेय.

विराट कोहलीला न विचारताच त्याची बॅग उघडली, परफ्यूमही वापरला; चिकाराच्या वर्तनानं RCB चे खेळाडू हैराण

आयपीएल गुणतालिका

संघ       सा.    वि.     .       गुण               नेररे

बंगळुरू   1   1  0  2      2.137

लखनौ    2   1  1  2      0.963

पंजाब    1   1  0  2      0.550

चेन्नई     1   1  0  2      0.493

दिल्ली   1   1  0  2      0.371        

हैदराबाद    2  1  1   2 –      0.128

कोलकाता    2  1  1   2 –      0.308

मुंबई     1   0  1  0   – 0.493

गुजरात  1   0  1  0   – 0.550

राजस्थान    2  0  2   0 –      1.882

टीप ः सा. ः सामना, वि. ः विजय,

. ः पराभव, नेररे ः नेट रनरेट

(ही आकडेवारी हैदराबादलखनौ सामन्यापर्यंतची आहे.)