
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन दुखापतीमुळे लखनौ सुपरजायंट्स विरोधातील सामना खेळू शकणार नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याची संघात वर्णी लागली आहे. अवघ्या 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणारा वैभव हा आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
27 मार्च 2011 ला जन्मलेला वैभव हा डावखुरा फलंदाज आहे. अंडर 19 च्या ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्यात वैभवने शतक लगावले होते. त्यानंतर दोन महिन्यातच त्याला आयपीएलची लॉटरी लागली. आयपीलसाठी राजस्थानने त्याला विकत घेतलं तेव्हा तो 13 वर्षांचा होता. राजस्थानने त्याला 1.1 कोटी अशा तगड्या किमतीत विकत घेतले आहे.