
आयपीएल 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात पहिला सामना 22 मार्च रोजी खेळला जाईल. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. त्याचबरोबर अंतिम सामना 25 मे रोजी इडन गार्डन्सवरच होणार आहे. एकूण 13 ठिकाणी आयपीएलचा 18 वा हंगाम खेळला जाणार असून 74 सामने खेळवले जाणार आहेत. एकून 65 दिवस चौकार आणि षटकारांची आतषबाजी चाहत्यांना अनुभवता येणार आहे.
🚨 News 🚨
BCCI announces schedule for TATA IPL 2025
Details 🔽
— IndianPremierLeague (@IPL) February 16, 2025
आयपीएलचे दोन मातब्बर संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स 23 मार्च रोजी आमने सामने येतील. चेन्नईच्या एम ए चिंदबरम स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये पहिला सामना रंगणार आहे. त्याच दिवशी दुपारी हैदराबाद आणि राजस्थान हे संघ भीडतील. आयपीएलच्या तिसऱ्या दिवशी 24 मार्च रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या संघामध्ये विशाखापट्टनम येथे सामना होईल. तर 25 मार्च रोजी गुजरात आणि पंजाब किंग्स हंगामातील आपला पहिला सामना अहमदाबादमध्ये खेळतील.
पहिला क्वालिफायर सामना 20 मे रोजी हैदराबादमध्ये आणि दुसरा क्वालिफायर सामना 23 मे रोजी कोलकातामध्ये होणार आहे. तसेच एकमेव एलिमिनेटर सामना 21 मे रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल आणि अंतिम सामना 25 मे रोजी कोलकातामध्ये खेळला जाईल.