IPL 2025 – थला पुन्हा आला! ऋतुराज गायकवाड स्पर्धेतून बाहेर

चेन्नईच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. दुखापतीमुळे ऋतुराज गायकवाड आयपीएलमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे उर्वरित सामन्यांसाठी चेन्नईच्या नेतृत्वाची धुरा महेंद्र सिंग धोनीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. शुक्रवारी (11 एप्रिल 2025) कोलकाता नाईट राडयर्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात महेंद्र सिंग धोनी कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. चेन्नईचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

ऋतुराज गायकवाडला 30 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात दुखापत झाली होती. दुखापतीतून सावरण्यास त्याला बराच वेळ लागणार आहे. त्यामुळे अनुभवी महेंद्र सिंघ धोनी उर्वरित सामन्यांमध्ये चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार आहे. चेन्नईने आतापर्यंत पाच सामने खेळले असून चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्कराला लागल आहे. मुंबईविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात त्यांना विजय मिळवला होता. त्यानंतर अजूनही संघाला सुर गवसलेला नाही. आता महेंद्र सिंग धोनी नेतृत्व करणार असल्यामुळे संघ पुन्हा एकदा फॉर्मात येतो का? हे पाहण्यासाठी चेन्नईचे चाहते आतुर आहेत.